मराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस

भाजपमधील इनकमिंगवर फडणवीसांचे मोठे विधान

मुंबई :- सध्याच्या घडीला मराठा आरक्षणाचा मुद्दा आता आणखीनच तापणार अशा वळणावर आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरू होणार होती. मात्र, न्यायालयानं आज सुनावणीला स्थगिती दिली. आता प्रकरणावर ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज (२० जानेवारी) हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आलं होतं.

ही बातमी पण वाचा:- उद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस ज्वलंत होत चालला आहे. आजच्या सुनावणीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे.

फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणाची ही स्थिती फक्त सरकारच्या गोंधळामुळे, राज्य सरकारच्या मनात काय कळत नाही, राज्य सरकार या विषयात काय करु इच्छिते हे कळत नाही.

सरकार ठाम भूमिका मांडू शकत नाही, प्रत्येकवेळी नवीन भूमिका मांडली जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोळ होतात, सरकारने कमिटी स्थापन केली, पण त्या कमिटीत काय निर्णय होतात कळत नाही, हे प्रकरण अत्यंत वाईट पद्धतीने हाताळलं जात असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

भाजपमधील इनकमिंग वाढणार –

भाजपमधून कोणीही बाहेर जाणार नाही, उलट आमच्याकडेच लोक येणार आहेत असेही फडणवीस यांनी यावेळी विरोधकांना सुचित केले.

ही बातमी पण वाचा : मराठा आरक्षण : सुनावणी पुन्हा लांबणी; ५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER