बॉलिंग आणि बॅटिंगही करणार, फडणवीसांचे सूचक विधान

Devendra Fadnavis

मुंबई :- सचिन वाझे (Sachin waze) आणि मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यूप्रकरणानंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आणि रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक असा सामना रंगला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले असताना आज क्रिकेटच्या भाषेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर फटकेबाजी केली. क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मिळाली की फार मजा येते. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचित करायचो. पण जेव्हा फिल्डींग करायचो, तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटला नाही. पण आता माझं ठरलंय, मी वेगवान बॉलिंगही करणार आहे, गुगलीही करणार आहे आणि जोरदार बॅटिंगही करणार, तेव्हा शॉट्सदेखील मारणार आहे, असं म्हणत फडणवीसांनी सूचक विधान केले आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका केली. सध्याच्या परिस्थितीत इतके लूज बॉल मला मिळत आहेत, की ते बॉल मला सीमारेषेपार पाठवावेच लागतील. आणि बॉलिंगचं बोलायचं, तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल, ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. त्यामुळे मला वाटतं की समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना फडणवीस यांनी रश्मी शुक्ला प्रकरणावरून राज्य सरकारला उलटप्रश्न केला. माझा प्रश्न आहे की चौकशी कुणाची करायला हवी? ज्यांनी चोरी पकडली त्यांची की ज्यांनी चोरी केली त्यांची? ज्यांनी चोरी केली त्यांना आम्ही मोकाट सोडू आणि का पकडलं याकरता आम्ही चौकशी करू हा या सरकारचा न्याय आहे. यातूनच हे सरकार कुणाला पाठिशी घालतंय हे स्पष्ट होत आहे. जे संभाषण झालं, जे व्यवहार झालेत, जे रॅकेट झालं, त्यावर कारवाई करण्याची मानसिकता या सरकारमध्ये दिसून येत नाही. एखाद्या महिला अधिकाऱ्याला टार्गेट करताना आपण काही मर्यादा ठेवतो का हे बघितलं पाहिजे. पण जे बोलले आहेत, त्यांच्याकडून मर्यादेचा विचार करणंच मूर्खपणाचं आहे, असं देखील फडणवीस म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) युपीएचं नेतृत्व करावं, अशी मागणी पुन्हा केली. त्यावर बोलताना फडणवीसांची मिस्कील टीका केली. युपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतो आहे. त्याच्या म्हणण्यानुसार कोण कॅप्टन हे ठरत नसतं. त्यासाठी टीममध्ये असायला लागतं. टीमच्या बाहेरच्या माणसाने ते म्हणून काही फायदा नसतो, असं ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : एखाद्याला बदनाम करण्याची फडणवीस यांची जुनीच पद्धत;  एकनाथ खडसे यांचे  भाजपवर टीकास्त्र 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER