इतिहासात पहिलेच इगो असलेले सरकार!-देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on mahavikas aghadi govt

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना राज्य सरकारने विमान प्रवासाला परवानगी नाकारली. राज्याच्या इतिहासात इतके इगो असलेले पहिले सरकार आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर घणाघात टीका केली.

फडणवीस म्हणाले की, “मी ऐकलेला हा सर्व प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. कोश्यारी हे राज्याचे प्रमुख घटक आहेत. ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ नेमणूक करतात. त्यांना कुठेही जायचे असेल, तर राज्यसरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला पत्र द्यावे लागते. त्यानुसार प्रशासन आदेश काढते. याबाबत मी माहिती घेतली आहे.”

त्यानंतर प्रशासन विभागाने फाईल तयार करून मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली होती, असे असताना राज्यपालांना विमानातून उतरविणे, हे योग्य नाही. आपण कुठल्या पदाचा अपमान करतो आहे, हे भान असणे गरजेचे आहे. इतका प्रचंड इगो कशाचा आहे. मला वाटते हा पोरखेळ चाललेला आहे. असा निषेधही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER