शेतक-यांच्या व्यथा पाहून फडणवीसांना पदाची आठवण म्हणाले, ‘दुर्दैवानं मी पदावर नाही…’

Devendra Fadnavis.jpg

उस्मानाबाद : परतीच्या पावसाने शेतक-यांचे अतोनात हाल केले आहे. हातात आलेले पिक पाण्यात गेले. राज्यातील नेते सध्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी दौ-यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रविण दरेकर (Pravin Darekar) हे सर्व नेते शेतक-यांच्या बांधावर जाऊन पाहणी करताना दिसत आहेत.

त्यातच या दौ-यात नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतानाही पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांना दौ-यात अनेक अनुभव येत आहेत. अनेक जण आजही फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्री असल्याच्या भावना व्यक्त करत असतात. त्यातच शेतक-यांच्या आताच्या व्यथा पाहून देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्री पदाची आठवण झाल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केला. मात्र, त्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळाला का? असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना ‘दुर्दैवानं मी पदावर राहिलो नाही’ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

खरंतर, मुख्यमंत्री पदासाठी राज्यात ऐतिहासिक अशी सत्तापालट महाराष्ट्राने पाहिली. लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभेच्या निकालानंतर शिवसेनेनं काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन भिन्न विचारांच्या पक्षांसोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली. यावेळी एकमताने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं आणि भाजपला जास्त मतं असूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली.

त्यामुळे मी दुर्दैवानं मी पदावर राहिलो नाही. पण सरकारनं ठरवलं आणि इच्छाशक्ती असेल तर सगळं शक्य आहे असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री असताना राज्यात अतिवृष्टीचं संकट ओढावलं होतं. त्यावेळी फडणवीसांनी हेक्टरी 10 हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात हेक्टरी 25 हजार रुपये मदतीची मागणी केली होती. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना केलेली मदत पुरेशी नसल्याचं सांगितलं होतं. तोच धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे जुने व्हीडिओ दाखवत आपल्या वक्तव्याची आठवण करुन दिली. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वत:च केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची संधी चालून आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER