नैतिकता महत्त्वाची, सत्य बाहेर आल्यावर बोलू; धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचे विधान

Dhananjay Munde-Devendra Fadnavis

नाशिक :- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी फेसबुकवर काल (१२ जानेवारी) करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत असलेल्या संबंधाची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. अशा प्रकारचे आरोप झाल्यानंतर नैतिकता महत्त्वाची असते. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आणि सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे सूचक विधान फडणवीस यांनी केले आहे. नाशिकमध्ये ज्येष्ठ स्वयंसेवक नाना नवले यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर (Social Media) आपल्या संबंधाची कबुली दिली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भात विचार करण्याची गरज आहे. त्यातील जी कायदेशीर बाब आहे, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी दोघांनी मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी कोर्टात गेल्याचं सांगितलं आहे. असं संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही. त्यामुळे तत्काळ पोलिसांनी या संदरंभातील सत्य बाहेर आणावं. पोलिसांनी एकदा सत्य बाहेर आणलं की, आम्ही आमची मागणी उचलून धरू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीत गेलेल्या नेत्यांवरही प्रतिक्रिया दिली.

जे दुसऱ्या पक्षात गेले त्याचं वाईट वाटत नाही. अजूनही काही नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. २०१४ मध्ये सत्ता नसताना आमची सत्ता आली. निवडणुकीच्या तोंडावर पक्षविस्तार होतच असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर केलं. खरे तर त्यांच्याकडे अधिकार आहेत. ते अधिकार असलेल्या पदावर बसले आहेत. त्यांनी ट्विटरवर असं काही टाकण्यापेक्षा मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर करून निर्णय घ्यावा. हे म्हणजे डुप्लिकेट काम झालं, असा चिमटा काढतानाच औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेस-शिवसेनेची मिलीजुली कुस्ती सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : ‘त्या’ मुलांवरून धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार? जाणून घ्या  तज्ज्ञांचे मत…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER