संख्येकडे नाही तर रुग्णांच्या व्यवस्थापनावर लक्ष द्या – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पनवेल दौऱ्यावर आहेत. त्यांनी पनवेलमधील कोरोना रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. “पनवेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण ४६ टक्के आहे. जून महिन्यात पनवेलमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

” असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘संख्येच्या व्यवस्थापनावर नको, तर रुग्ण व्यवस्थापनावर लक्ष द्या’ असे त्यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे. दरम्यान महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांत १९८ मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांच्या या संख्येमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ९२ हजार ९९० इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख ४ हजार ६८७ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत महाराष्ट्रात ८ हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू कोरोनाची बाधा झाल्यामुळे झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ७९ हजार ९११ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER