राज्य सरकारविरोधात पटोलेंनी आंदोलन केलं असावं, काँग्रेसच्या मोर्च्यावर फडणवीसांची गुगली

मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरूवात झाली असून, पहिल्याच दिवशी सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने मोर्चा काढून इंधन दरवाढीविरोधात (Petrol prize hike) मोर्चा काढला. मात्र काँग्रेसने काढलेल्या या मोर्च्याचा विधानसभेचे विरोधीप क्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समाचार घेतला. राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवर 27 रुपये कर लावते. त्यामुळे राज्य सरकारने इंधनावर लावलेल्या कराविरोधात मोर्चा काढला असावा, अशी कोपरखळी देवेन्द्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या मोर्च्यावर घेतली.

देशातील सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. केंद्र सरकारचा एकूण टॅक्स 32 रुपये आहे. राज्य सरकारनं 27 रुपये टॅक्स पेट्रोलवर लावला आहे. नाना पटोलेंचे आंदोलन राज्य सरकारविरोधात असावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. काँग्रेसला विरोधी पक्षांची जागा घेता येणार नाही. देशात काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे, अशा अवस्थेत मीडिया इवेंट ते करत आहेत. वीज बिलाचा मुद्दा महत्वाचा आहे. वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम राज्यात यापूर्वी कधी झाली नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

राज्यात काँग्रेसची अवस्था वाईट आहे, काँग्रेसचा सायकल मोर्चा हा मीडिया इवेंट, 27 रुपये पेट्रोल आणि डिझेलवर त्याठिकाणी लावलेला आहे, खरंच बघितलाच केंद्र सरकारचा एकूण 33 रुपये त्याच्यामध्ये चार रुपये हे कृषी चार रुपये कमिशन आहे, उर्वरित हे पैशात त्यातले 42 टक्के पैसे केंद्र सरकारकडे येतात येथे राज्याला परत करताना राज्य सरकारने मात्र 27 रुपये पेट्रोलवर लावलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की नाना पटोले पश्चाताप समृद्ध असावं किंवा 27 रुपयाचा टॅक्स कमीत कमी करावा आणि दुसरा क्रमांक किंवा इतर राज्यांप्रमाणे किमान दहा रुपये हे पेट्रोल डिझेल स्वस्त करावं आंदोलन असावा तेव्हा दुसरी शंका अशी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER