उद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis

मुंबई :- सोमवारी सह्याद्रीवर रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधत रस्त्यावर कितीही खड्डे – स्पीडब्रेकर आले तरी मी कार आमि सरकार दोन्हीवर ढील पडू देत नाही असे वक्तव्य केले होते. यावर आता विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार उत्तर दिले आहे. ‘उद्धवजी कार फार चांगली चालवतात. ट्रॅफिक नसलेल्या रस्त्यावर कार अशीच सुरळीत चालणार. मात्र सरकार अशारितीनं चालवता येत नाही’, अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धवजी कार फार चांगली चालवतात. ट्रॅफिक नसलेल्या रस्त्यावर कार अशीच सुरळीत चालणार. मात्र सरकार अशारितीनं चालवता येत नाही. सरकारमध्ये ट्रॅफिक सुरुच राहते. या सर्व गोष्टींबद्दल जनता त्यांना योग्य उत्तर देईल, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हँडलवरुन तशा प्रकारचं एक ट्वीटही करण्यात आलं आहे.

ही बातमी पण वाचा : रस्त्यावर कितीही खड्डे, स्पीडब्रेकर आले तरी कार – सरकारची पकड ढिली होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना ठणकावले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संधी मिळेल तिथे आपल्या बोलण्याच्या शैलीतून विरोधकांवर लक्ष्य साधत असतात. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील तेवढ्याच जोरकसपणे त्यांना उत्तर देत असतात.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ठाकरे –

”मी उत्तम गाडी चालवतो, उत्तम चालवतो की नाही याची कल्पना नाही. पण सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतोय”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. मध्ये मध्ये स्पीडब्रेकर येत असतात, खड्डेही असतात. पण तरीसुद्धा स्टेअरिंगवरची पकड मी सुटू देणार नाही. मास्क घालणे, हात धुणू आणि अंतर ठेवणे ही आपली जीवनशैली आता बनलेली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER