देवेंद्र फडणवीस आझाद मैदानात निदर्शकांना भेटले

Devendra fadnavis

मुंबई : आझाद मैदानात विविध संघटनांची आंदोलने सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज आझाद मैदानात जाऊन महिला बचत गट, कोळी समाज या निदर्शकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. फडणवीस म्हणाले, महिला बचत गटांनी मोठे काम केले आहे.

राज्यातील ८० लाख महिला याच्याशी जुळल्या आहेत. ‘उमेद’ प्रकल्पातून महिलांनी केलेल्या कामाची माहिती देऊन फडणवीसांनी प्रकल्पाच्या खाजगीकरणाच्या प्रयत्नावर टीका केली. ते म्हणाले की, या प्रकल्पाचे खाजगीकरण करण्यासाठी मंत्रिमंडळ, विधिमंडळाची मान्यता घेण्यात आली नाही. या खाजगीकरणाला आम्ही विरोध करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER