जळगावात भाजपला मेगागळती थांबणार ; अखेर देवेंद्र फडणवीस मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना भेटले

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केल्यामुळे जळगावात भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजपचे (BJP) अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. अखेर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) ड्रॅमेज कंट्रोल करण्यासाठी जळगावात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज मुक्ताईनगरमध्ये जाऊन भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पक्षबांधणीवर चर्चा केली. त्यामुळे जळगाव भाजपमधील पडझड थांबणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फडणवीस येणार म्हणून खडसे यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी फडणवीस यांनी खडसेंच्या घरात बसून जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या बांधणीवर रक्षा खडसे यांच्याशी चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच जळगावमध्ये खासकरून रावेर मतदारसंघात तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीवरही त्यांनी चर्चा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button