राजभवनावर हालचालींना वेग : राज्य सरकारला जाब विचारा; फडणवीसांची राज्यपालांकडे मागणी

Devendra Fadnavis - Governor Bhagat Singh Koshyari Video

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून राजकीय वातावरण तापले असतानाच राजभवनावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली आहे. राज्यात अघोषित आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण करून पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‪माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा, असेही फडणवीस यांनी निवेदनात म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात साधूंची झालेली हत्या अमानवीय, मात्र त्याला धार्मिक रंग देऊ नये – मुख्यमंत्री ठाकरे

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या राज्यपालनियुक्त आमदारकीवरून विरोधी पक्ष भाजपा आणि महाविकास आघाडी समोरासमोर आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यत्वाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीने कार्यवाही करावी, या विनंतीचा पुनरुच्चार झाला. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आज सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना नवा प्रस्ताव सादर करतील, अशी बातमी ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने प्रसारित केली आहे.