देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात : सुधीर मुनगंटीवार

त्यासाठी उद्धव ठाकरे आणि विरोधी देवेंद्र फडणवीस यांची एकत्र बैठक होण्याची गरज आहे

Sudhir Mungantiwar

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा वळण घेते की काय अशा भेटीगाठी पुन्हा सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गुप्त भेटीच्या चर्चेनंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर यामधला ट्विस्ट आणखीनच वाढला आहे.

सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, शिवसेना आणि भाजप सध्या खूप दूर आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत सध्या वातावरण नाही. संबंध तुटले नाहीत, पण संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस वेगळ्या काराणासाठी भेटले असू शकतात, असं मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. तसेच उद्या देवेंद्र फडणवीस अजित पवारांची (Ajit Pawar) आणि शरद पवारांची (Sharad Pawar) देखील भेट घेऊ शकतात, असंही त्यांनी नमूद केलं.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “केवळ एका बैठकीने शिवसेना-भाजपची युती होईल असं वाटत नाही. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एकत्र बैठक होण्याची गरज आहे. शिवसेना-भाजप आता एकमेकांपासून खूप दूर गेले असून एकत्र येण्यासाठी सध्याचं वातावरणही नाही आणि परिस्थितीही तशी नाही. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत एकत्र येत असतील तर त्यात राजकारण पाहू नका. ही बैठक माहित झाली याचा अर्थ ही बैठक गुप्त नाही हे उघड आहे. ज्या बैठकीत काही घडायचं असतं ती गुप्त राहते. ज्यात काहीच घडायचं नसतं त्या बैठकीचे व्हिडिओ, फोटो माध्यमांना मिळतात. बैठक झाली हे आम्हाला माहिती नाही.”

तसेच ते म्हणाले, “लपवाछपवी करण्याचं काही कारण नाही. ही बैठक झाल्याची माहिती आमच्यापैकी कुणालाच नाही. राजकारणात मी 40 वर्षांपासून काम करतो. या 40 वर्षात एका गोष्टीची माहिती निश्चित आहे ज्यात काही घडणार आहे ती बैठक गुप्त असते. ज्या बैठकीत काहीच होणार नाही त्या बैठकीचे फोटो व्हिडीओ तुम्हाला मिळतात.”

सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना-भाजप युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. “देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली ही माहिती माध्यमांमधूनच कळते आहे. जर ही बैठक गुप्त असेल तर त्याची माहिती कुणालाही होण्याचं काही कारण नाही. ते दोघे एखाद्या कारणाने एखाद्या ठिकाणी एकत्र येत असतील तर प्रत्येक गोष्टीत राजकारणच असेल असं वाटणं योग्य नाही. दोन विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात. माध्यमांना ही माहिती मिळाली याचा अर्थ ही बैठक गुप्त नाही, या बैठकीत काहीही होत नाही. ज्या बैठकीत काही घडवायचं असतं ती बैठक कधीच गुप्त असू शकत नाही,” असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER