देवेंद्र फडणवीस – खडसे आज जळगावात एकाच व्यासपीठावर ; नाथाभाऊ काय बोलतील याकडे लक्ष

Eknath Khadse - Devendra Fadnavis

मुंबई : भाजपचे (BJP) नाराज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश निश्चित मानला जात असतानाच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.

रुग्णालय उद्घाटनासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगावात असतील. या कार्यक्रमात फडणवीस, खडसे , महाजन एकाच व्यासपीठावर एकत्र दिसमार आहेत. त्यामुळे आज एकनाथ खडसे काय बोलतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, आता एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश हा निश्चित मानला जात आहे. लवकरच राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

अलीकडे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड न झाल्यामुळे खडसे कमालीचे दुखावले गेले होते. त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती.

परंतु, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाबद्दल वृत फेटाळले होते. या सर्व पार्श्वभूमीवर खडसे आज जळगावात काय बोलतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER