शरद पवारांनीच युपीएचे नेतृत्व करावे हे अनेक अनेक पक्षांना मान्य ; संजय राऊतांचे विधान

Sharad Pawar - Sanjay Raut

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) युपीएचे नेतृत्व करण्यासंबंधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . याच पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोनिया गांधी यांची दिल्लीत भेटल्याची चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी मात्र काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे वृत्त फेटाळलं आहे. युपीएमध्ये शरद पवारांच्या नावाला कोणाचा विरोध असल्याची माहिती नाही असंही ते म्हणाले आहेत. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसमध्ये नाराजी वैगेरे काही नाही. किंबहुना काँग्रेस पक्षातूनच अशा सूचना येत आहेत. युपीए अधिक मजबूत होण्यासाठी ही काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची भूमिका आहे. सोनिय गांधीचीही (Sonia Gandhi) तशी भूमिका असू शकते. सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ युपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी युपीएचे नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावं ही अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अत्यंत विकलांग अवस्थेत आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी म्हटले .

शरद पवार यांच्याकडे किती खासदार आहेत, हा प्रश्न नाही. मी नेहमीच शरद पवार यांचे समर्थन केले आहे. जे पक्ष यूपीए किंवा एनडीएमध्ये नाहीत अशा पक्षांना एकत्र आणून यूपीएची पुनर्बांधणी झाली पाहिजे. अनेक पक्षांना शरद पवार यांचे नेतृत्त्व मान्य होऊ शकते, असे संजय राऊत म्हणाले .

विरोधी पक्षनेते मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत. विरोधी पक्षनेत्याने त्या पदाची प्रतिष्ठा नष्ट होईल, कमी होईल असे वर्तन करु नये. शेवटी देशातील शोषित, पीडितांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो, सरकार नसते याचे भान प्रत्येत विरोधी पक्षनेत्याने ठेवलं पाहिजे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसू होते , लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजले पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला असून यावर आता जास्त चर्चा होता कामा नये. यामध्ये विशेष कोणतीच बाब नसल्याचे राऊत म्हणाले .

ही बातमी पण वाचा : राज्यपालांच्या माध्यमातून भाजपला सत्ता गाजवायचीय, त्यासाठी लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल ; शिवसेनेचा घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER