
मुंबई :- विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या – ‘फासा आम्हीच पलटणार’ या वक्तव्याची टिंगल करताना काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणालेत, देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत, पण काहीही बोलतात!
एका वृत्त वाहिनीशी बोलताना नाना म्हणालेत, महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भाजपा (BJP) पक्ष भविष्यात नावालाही उरणार नाही!
भाजपा हा राज्यात सर्वात मोठा पक्ष आहे. तरीही विरोधी पक्षात आहे. ही लोकशाहीची थट्टा आहे. आम्हीच फासा पलटवू. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल असे फडणवीस म्हणाले होते.
ही बातमी पण वाचा : “फासा आम्हीच पलटणार” : देवेंद्र फडणवीस
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला