शरद पवार हे मोठे नेते आहेत ; ‘त्या’ खोचक टिप्पणीला फडणवीसांचे प्रत्युत्तर

Sharad Pawar & Devendra Fadnavis

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) हे मोठे नेते आहेत. मी लहान नेता आहे. मला पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर राजकारणाची संधी मिळाली. मी ती जबाबदारी एका पातळीपर्यंत चोखपणे पार पाडली, याबद्दल मी समाधानी आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले .

बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला होता. देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, अशी मिष्किल टिप्पणी त्यांनी केली होती. शरद पवार यांच्या खोचक टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले .

पवारसाहेब मोठे नेते आहेत. मी लहान नेता आहे. मला पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात संधी मिळाली. मला जे करता येईल ते मी केले. मात्र, खऱ्या लढाईच्यावेळी मी आजारी पडलो. पण मला शक्य असणाऱ्या सर्व गोष्टी मी केल्या. मी ही लढाई वरच्या टप्प्यात नेऊन ठेवली, याचा मला आनंद असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER