अधिवेशन गाजवलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर एक नवी जबाबदारी

Devendra Fadnavis

मुंबई :- भाजप (BJP) नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विविध मुद्द्यांवर ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणखी एक नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित असलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही निवड करण्यात आली. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. संपर्कप्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकॉनॉमिक कौन्सिलशी संलग्न असलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी १९८२ पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. या आमसभेत उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे तर सचिवपदी भाई गिरकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER