मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना ज्या भाषेत पत्र पाठवले आहे, ते अतिशय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई :- मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ज्या भाषेत पत्र पाठवले आहे, ते अतिशय दुर्दैवी असे उत्तर आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. देवेंद्र फडणवीस ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाचे उद्घाटनासाठी आज जामनेर येथे आले आहे. यावेळी ते बोलत होते .

राज्यपाल यांच्याकडे जी निवेदन येत असतात, ती निवेदन घेऊन राज्यपाल हे एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्या पत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ज्या प्रकारे पत्र पाठवले आहे, ते दुर्दैवी आहे. तीन पक्षाचे सरकार आहे. शिवसेना (Shivsena) ही स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई लढतो, असल्याचे सांगतो पण त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो याबद्दल आश्चर्य वाटते , अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना पात्राच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही , अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत उत्तर दिले.

ही बातमी पण वाचा : ‘हिंदुत्वाचा विसर पडून धर्मनिरपेक्ष झालात का’? राज्यपालांच मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER