शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई :- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, या मागणीसाठी बडनेऱ्याचे आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर राणा यांना पोलिसांनी अटक केली आहे. रवी राणा यांचा आजचा दिवसही कारागृहातच जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निषेध व्यक्त केला आहे.

ही बातमी पण वाचा : आमदार रवी राणा कारागृहात तर नवनीत राणा यांचे कारागृहासमोर धरणे आंदोलन

‘शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनीसुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो’, अशा शब्दात रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER