भाजपमध्येच इनकमिंग होणार : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis & Sachin Sawant

मुंबई : पुणे महानगरपालिकेतील भाजप (BJP) नगरसेवक कुठेही जाणार नाहीत. उलट भाजपमध्येच इनकमिंग होणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजपमधून १९ नगरसेवक पक्षांतर करणार या चुकीच्या बातम्या आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला. फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) सुनावणीवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

राज्य सरकार ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या प्रकरणात घोळ घालतंय त्यावरून सरकारच्या मनात काय आहे तेच कळत नाही. काही पिटीशन दाखल होतात आणि मग त्यासाठी राज्य सरकार वेळ मागत आहे. राज्य सरकार या प्रकरणात काय करू इच्छिते ते लक्षात येत नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाजप नेत्यांचं समाधान करण्यापेक्षा मराठा समाजाचे समाधान करा, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांना (Sachin Sawant) लगावला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्य सरकारच्या हालचालींमुळे आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं पाहिजे, अशी परिस्थिती राज्य सरकारची दिसते. एमपीएससी आणि राज्य सरकारचा घोळ तयार झाला असून याला राज्य सरकार जबाबदार आहे, असंही फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER