शिवसेना आणि काँग्रेसकडून आणीबाणीच्या मानसिकतेचे प्रदर्शन : देवेंद्र फडणवीस

Arnab Goswani-Devendra fadnavis

मुंबई :- रिपब्लिक टीव्हीच्या (Republic TV) अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पनवेल पोलिसांनीअर्णव गोस्वामी यांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे . आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे .

आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे, अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडी सरकारच्या असहिष्णुतेचा खरा चेहरा जगासमोर : आशिष शेलार 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER