देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द

मुंबई : १० नोव्हेंबर २०१४ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. २०१४ ते २०१९ ही पाच वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळल्यानंतर आता काही तासांतच विधानसभा कार्यकाळ संपणार या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे.

 १४ व्या विधानसभेसाठी राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमतांचा कौल दिला; मात्र युतीपक्ष शिवसेनेच्या अट्टहासामुळे राज्यात मागील १५ दिवसांपासून सत्तासंघर्ष पेटला आहे. तो आजतागायत शमलेला नाही. शेवटपर्यंत शिवसेना नमती भूमिका घेणार, सामंजस्याने काही ठरेल आणि लवकरच राज्याला गोड बातमी मिळेल, असे वारंवार भाजप नेते सांगत होते. महायुतीचीच सत्ता येईल, असाच विश्वास भाजप नेते व्यक्त करत होते.

मात्र, ती शक्यता आता मावळलेली दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आज पदाचा राजीनामा देतात की सत्तास्थापनेचा दावा करतात याची राजकीय नेत्यांना उत्सुकता होती. मात्र, त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे.

ही बातमी पण वाचा : आम्हाला मुख्यमंत्री पदाचे पत्र हवे; संजय राऊत यांची गडकरींना अट