देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन; रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळत आहे. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंच्या तब्येतीबद्दल चौकशी केली. तसेच यावेळी फडणवीस आणि उद्धव ठाकरेंबद्दल वाढत्या कोरोनाबद्दल चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सद्य:स्थितीत रश्मी ठाकरे यांच्यावर एच. एन. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना रश्मी वहिनींची तब्येत कशी आहे? अशी विचारपूस केली.

तसेच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकार जो निर्णय घेईल, त्याबाबत विरोधी पक्षांकडून सहकार्य मागितले. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सहकार्य करण्याची तयारी दाखवल्याची माहितीही पुढे आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button