सत्तेसाठी महापुरुषांचा किती अपमान सहन करणार?, फडणवीसांचा शिवसेनेला प्रश्न

devendra-fadnavis-attacks-on-cm-uddhav-thackeray

मुंबई : भाजपने महाआघाडी सरकारविरोधात राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारलं आहे. राज्यभरात आंदोलनं होत आहेत. मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेवर हल्लाबोल केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस अपमानित करत आहे. याठिकाणी सावरकर यांचं नाव घेणारे सत्तेसाठी काही बोलत नाही. शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी चालेल मात्र आम्ही खुर्ची सोडणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. सत्तेसाठी महापुरुषांचा किती अपमान सहन करणार? असा प्रश्न त्यांनी शिवसेनेला विचारला. तसेच कोणी तरी म्हणतो १०० कोटीवर १५ कोटी भारी आहे, वारीस का लावरीस. त्याला सोडणार नाही. सेना फक्त मूग गिळून गप्प बसली आहे, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

बांधावरच्या घोषणेचं काय झालं? सांगा उद्धवजी सांगा! : देवेंद्र फडणवीस