देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमिरातला राहणाऱ्या मराठी कुटुंबियांना मदतीचे आश्वासन

Devendra Fadnavis Video

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात लॉकडाऊन करण्यात आले. जगभरातील उद्योगधंदे ठप्प पडले. यामुळे परदेशात कामानिमित्त गेलेल्या मराठी कुटुंबियांवर मोठे संकट उभे ठाकले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अश्याच अमिरात येथे राहत असलेल्या आणि सध्या संकटात सापडलेल्या मराठी कुटुंबियांशी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी झूम अ‌ॅपच्या माध्यमातून चर्चा केली. तसेच त्यांच्यासमोर येत असलेल्या समस्या जाणून घेतल्या.

सध्या अरब देशांमध्ये लॉक डाऊन सुरु आहे. त्यामुळे या देशांमध्ये व्यवसाय करणारे मराठी कुटुंब मोठ्या संकटाचा सामना करत आहे. त्याचा व्यवसाय बंद पडल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी केंद्र अथवा राज्य शासनाने मदतीसाठी पावले उचलावीत अशी विनंती फडणवीस याना करण्यात आली. यावर फडणवीस यांनी अरब देशामध्ये असलेल्या मराठी कुटुंबियांच्या मदतीसाठी मी स्वतः राज्य आणि केंद्र सरकारशी बोलून आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न कारेन. आपण वेळोवेळी माहिती दिल्यास त्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाशी बोलून जी काही मदत शक्य होईल ती केल्या जाईल. असे आश्वासन फडणवीस यांनी मराठी कुटुंबियांना दिले. तसेच ज्यांना भारतात परत यायचे असेल त्यांच्यासाठी शक्य तेवढी यंत्रणा कामाला लावू. तसेच ज्यांना तिथेच राहायचं असेल तर त्यांच्या अडचणीही दूर करण्याचा प्रयत्न करू असेही फडणवीस यावेळी म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER