देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा प्रश्न !

Devendra Fadnavis-Ajit Pawar

मुंबई :- मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये मेट्रोचे काम तेजीने सुरू आहे. त्यातच नागपूर मेट्रोचे (Nagpur Metro) काम, बरीच स्टेशन्स लॉकडाऊनपूर्वीच पूर्ण झाली आणि नागपूरकरांना मेट्रोचा आनंदही घेता आला. नागपूरपाठोपाठ मुंबई, पुणे येथील मेट्रोचे काम पूर्णत्वास नेण्यास सरकार प्रयत्नशील आहे.

अशातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत ‘मुंबईत मेट्रो-३ मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करू शकेन?’ असे खोचक ट्विट केले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ट्विटला त्यांच्याच शैलीत उत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “राज्यात मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांत मेट्रोचे काम सुरू आहे. हे सर्व काम आम्ही तडीस नेत आहोत. मेट्रोच्या कामासाठी राज्याच्या हिश्शाचा पूर्ण निधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसून काय ट्विट करावे तो त्यांचा प्रश्न आहे. ” दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील मेट्रोमधून प्रवास करतानाचे फोटो ट्विट केले आहेत. तसेच त्यांनी या ट्विटरमध्ये ‘मुंबईत मेट्रो-३ मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करू शकेन?’ असा सवाल करत महाविकास आघाडीला चिमटा काढला होता.

ही बातमी पण वाचा : ‘मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणार’, अजित पवारांनी कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER