रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

Rambhau Mhalgi Prabodhini - Devendra Fadnavis - Maharashtra Today
  • डॉ. विनय सहस्त्रबुद्धे उपाध्यक्ष, भाई गिरकर सचिव

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची (Rambhau Mhalgi Prabodhini) सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही निवड करण्यात आली. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकॉनॉमिक कौन्सिलशी संलग्न असलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी 1982 पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

या आमसभेत उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची, तर सचिवपदी भाई गिरकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER