केंद्राकडून फडणवीसांवर मोठी जबाबदारी; बिहार निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती

Devendra Fadnavis

मुंबई :- माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर भाजपकडून (BJP) मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली. पक्षाने आज अधिकृतपणे प्रसिद्धिपत्रक जारी करून ही घोषणा केली. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची २४३ सदस्य असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जदयु आणि एलजेपीसारख्या मित्रपक्षांसोबत जागावाटपाविषयी चर्चा सुरू आहे.

बिहार विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यांत होणार आहेत. पहिल्या टप्प्याचे मतदान २८ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्याचे मतदान ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ नोव्हेंबरला होणार असून १० नोव्हेंबरला बिहारचा निकाल स्पष्ट होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बिहार निवडणुका महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

दरम्यान, फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती होण्याची चर्चा सुरू होती. यापूर्वी फडणवीस यांनी अनेकदा बिहारचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांची  नियुक्तीची चर्चा रंगली होती. फडणवीस यांनी महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकी दरम्यान आपल्या संघटन कौशल्याचा वापर करत सर्वाधिक उमेदवार निवडून आणले होते. त्यामुळं पक्षानं त्यांच्या याच कामगिरीवर खूश  होऊन त्यांना हे प्रमोशन दिलं असल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER