“ना नौ मन तेल होगा, ना राधा नाचेगी”; नवाब मालिकांचा फडणवीसांना टोला

Devendra Fadnavis and Nawab Malik

मुंबई : सरकार बदलायचे माझ्यावर सोडा, मी बघतो, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिला. मी त्यांना सांगू इच्छितो की, “ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी” हे सरकार पाच वर्ष टिकून आपला कालावधी पूर्ण करेल, असे नवाब मलिक म्हणाले.

“पंढरपूरमध्ये मते मागत असताना त्यांचा कार्यक्रम करू असे सांगून ते लोकांकडून मदत मागत आहेत . त्यांना घाबरवण्याचे काम देवेंद्रजींनी केले आहे. आणि गेले पंधरा महिने भाजप हेच करू इच्छित आहे. मी त्यांना सांगू इच्छितो ‘ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी’ हा हिंदीतील एक वाकप्रचार आहे. न होणाऱ्या किंवा अशक्य गोष्टींबाबत बोलणे असा या वाकप्रचाराचा अर्थ आहे. हे सरकार पाच वर्ष टिकून आपला कालावधी पूर्ण करेल.” या वाक्प्रचाराचा आधार घेत मालिकांनी फडणवीसांना टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button