देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सरसंघचालकांच्या भेटीला, चर्चेला उधाण

Mohan Bhagwat-Devendra Fadnavis-Chandrakant Patil

नागपूर : काल महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेनाची सांगता झाली. त्यानंतर आज सकाळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

आज सकाळी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील विमानतळावरून थेट संघाच्या मुख्यालयात दाखल झाले. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, भैय्याजी जोशी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये बंद दरवाजाआड तब्बल दीड तास चर्चा झाली. ही बैठक अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी माहिती देण्यात आली नाही. परंतु, सध्या राजकीय परिस्थितीवर आणि मराठा आरक्षणावर त्यांच्यात चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फडणवीसांनी नागपुरात दाखल झाल्यानंतर विमानतळावर अनेक मुद्द्यांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अधिवेशनात महाराष्ट्राच्या जनतेला काहीच मिळालेलं नाही, सगळ्यात महत्वाचे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची घोर निराशा झाली, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी राज्यात तीन महिन्यात भाजपाचं सरकार येईल असा दावा केला असून त्यासंबंधी विचारण्यात आलं असताना फडणवीसांनी बोलण्यास नकार दिला आणि त्याबद्दल सुधीरभाऊच सांगू शकतील असंम्हणत त्यांनी वेळ मारुन नेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER