शिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा एकदाचा निर्णय घ्या- देवेंद्र फडणवीस

Balasaheb Thackeray - Devendra Fadnavis

मुंबई :- शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव देण्यास आम्ही केव्हाही आणि कधीही विरोध केलेला नाही. पण शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे याचा निर्णय राज्य सरकारने एकदाचा घ्यावा, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. मंगळवारी भाजप प्रदेश कार्यालयात संघटनात्मक बैठक पार पडली. त्यानंतर फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे सरकारने वीज बिल वसुली सुरू केली आहे. राज्य सरकारने हजारो कोटींची सूट बिल्डर्संना दिलेली आहे. मात्र लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात सामान्य लोकांकडे रोजगार नव्हता. अशा वेळी सामान्य लोकांचे चारपट जास्त अलेले बिल हे सुधरवण्याची गरज होती. मात्र असं न करता थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचं काम सरकारकडून करण्यात येत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे आंदोलन हे नाटक असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.

ही बातमी पण वाचा : उद्धवजी फार चांगली कार चालवतात मात्र, सरकार… देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER