फडणवीस म्हणाले, ‘दोस्त दोस्त ना रहा..!

Devendra Fadnavis-CM Uddhav Thackeray

मुंबई : सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची खास उपस्थिती होती. कोणता मंत्री कधी कुठे काय बोलतो, काय गातो त्यांच्या गाण्याचे बोल, त्यांच्या वाणीतून निघणा-या प्रत्येक शब्दांना विशेष महत्त्व असते. त्यातच या पुरस्कार सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गायलेले एक गाणे चर्चेत आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मंचावरून ‘दोस्त दोस्त ना रहा…!’ हे गाणं गायलं (Dost dost na raha….) गाण्यातून त्यांनी जून्या दोस्तासाठी हे गायले असल्याचे दिसते. अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हे गाणं समर्पित केले व भाजप-शिवसेना युतीच्या तुटीबद्दल एकप्रकारे खंत व्यक्त केली असल्याचे बोलले जात आहे.

मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय काय घडले हे संपुर्ण महाराष्ट्राची जनता जाणते ते वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या वादाने असे काही रुप घेतले की, सत्तेत बसणा-या भाजपाशी शिवसेनेने काडीमोड घेतला व त्यांना थेट सत्तेपासूनच दूर केले. तेव्हापासून पक्ष विभक्त झाला तशी या दोन नेत्यांमधील मैत्रीही.

खरे तर असे असले तरी, राज्यातील कोणत्याही प्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कितीही आक्रमक होत असले तरी, आणि शिवसेना युतीतून बाहेर पडली असली तरी हे दोन्ही नेते एकमेकांविरुद्ध बोलणे नेहमी टाळतात.

मात्र, काल लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात फडणवीसांना या ‘जुन्या मित्रा’साठी अर्थात उद्धव ठाकरे यांच्यासाठी कोणतं गाणं समर्पित कराल, असं विचारलं असता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ‘दोस्त दोस्त ना रहा…’ हे गाणं त्यांनी डेडिकेट केलं. सोबत अमृता फडणवीसही होत्या. त्यांना हाच प्रश्न विचारला असता, ‘अजिब दास्तां है ये, कहां शुरू कहा खतम…’ या ओळी त्यांनी गुणगुणल्या!

ही बातमी पण वाचा : पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा; उद्धव ठाकरेंनी उडवली भाजपाची टिंगल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER