‘अशोका’चं झाड उंचच उंच वाढतं, सावली मात्र मिळत नाही – मुख्यमंत्री

CM Fadnavis-Ashok Chavan

नांदेड : मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नांदेडमध्ये पोहचल्यानंतर त्यांनी तेथे सभेला संबोधित केले. एकवेळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहीलेले, अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात मोठं झालेल्या नांदेडमधून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर चागलेच शरसंधान साधले.

ही बातमी पण वाचा:- महाजनादेश यात्रा आज लातूरमध्ये

2014 मध्ये मोदींच्या लाटेतही चव्हाणांनी आपला गड राखला होता. मात्र, 2019 च्या लोकसभेत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. हाच धागा पकडून मुख्यमंत्र्यानी जोरदार चौकार आणि षटकार मारलेत.

अशोकाचं झाड उंचच उंच वाढतं, त्याची सावली मात्र कोणाला मिळत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही नवी सावली शोधलेली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केली.

यंदा नांदेडकरांनी येथे नवीन सावली शोधून नवा इतिहास तुम्ही केलेला आहे.’ असं फडणवीस म्हणाले.

अशोक चव्हान यांनी आघाडीची सत्ता असताना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. 2014 मध्ये मोदीलाटेत काँग्रेसने ज्या दोन जागा जिंकल्या होत्या, त्यात नांदेडची एक जागा जिंकली होती. त्यानंतरही अशोक चव्हाणांनी नांदेड महापालिकेची निवडणूक जिंकली होती. मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. चव्हाणांचा भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभव केला होता. त्यानंतर अशोक चव्हाणांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला.