…म्हणून फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांसमोर पवारांच्या आत्मचरित्रातील ‘तो’ उताराच वाचून दाखविला

Sharad Pawar & Devendra Fadnavis

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) नव्या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या आत्मचरित्रात शेतकऱ्यांवरील बंधने काढून टाकण्यासंदर्भात व्यक्त केलेल्या मतप्रदर्शनाचा उतारा फडणवीस यांनी यावेळी वाचून दाखविला. आमचे सरकार सत्तेत असताना शेतकऱ्यांचे नाव घेत वारंवार रस्त्यावर उतरायचे. २००६ मध्ये महाराष्ट्राने कंत्राटी शेतीला परवानगी दिली होती.

आता हेच काँग्रेस, राष्ट्रवादी नव्या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. आता काँग्रेस – राष्ट्रवादीची मंडळी दुटप्पीपणे या कायद्याला विरोध करत आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले. कोरोना (Corona) महामारीच्या काळातही महाआघाडी सरकारने गैरकारभाराचा कळस गाठला आहे. अशा सरकारला बांधावर, रस्त्यावर उतरून वठणीवर आणू , असा निर्धार फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला . नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकरी आणि कामगार वर्गाच्या कल्याणासाठी केलेल्या कायद्यांना काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष केवळ राजकीय हेतूंनी विरोध करत आहे.

काँग्रेस – राष्ट्रवादी सरकार सत्तेत असताना २००६ मध्ये महाराष्ट्रात कंत्राटी शेतीला परवानगी दिली गेली होती. आता हाच काँग्रेस पक्ष कृषी कायद्यांना विरोध करण्याची भाषा करतो आहे. शेतकऱ्यांना या कायद्यांची माहिती पोहचविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत गेले असेही फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER