जनतेने नाकारलेल्या राज ठाकरेंवर सूडबुद्धीने कारवाई करण्याचा आम्हाला काय फायदा? – मुख्यमंत्री

Raj Thackeray

धुळे : कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणात गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून जवळपास आठ तास कसून चौकशी करण्यात आली आहे. रात्री ८ वाजता राज ठाकरे इडीच्या कार्यालयातून बाहेर पडले.

ही बातमी पण वाचा :- ईडी चौकशी : विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंना मिळाला मोठा मुद्दा

मात्र राज ठाकरेंच्या या चौकशीला भाजपला जबाबदार धरले जात आहे.राजकीय सूडबुद्धीने चौकशींचे सिसेमिरे मागे लावण्याचे भाजपचे धोरण असल्याचा आरोप विरोधकांनी सुरू केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी २०१४ च्या लोकसभेत एकही जागा मिळाली नाही, मग विधानसभा निवडणुकीत एक आमदार निवडून आला, तोही आमदार शिवसेनेत गेला. महापालिकेत नाशिक त्यांच्याकडे होती, तिथेही दोघेच जण निवडून आले. इतर कुठल्याही महापालिकेत त्यांची लोकं निवडून आली नाहीत.

तसेच नुकताच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत इतकी टोकाची भूमिका राज ठाकरेंनी घेतली. ते विरोधकांचे स्टार प्रचारक बनले. वाटेल तसे आरोप केलेत. कुठल्याही स्तरावर जाऊन बोलले. तरी देखील त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग ज्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने नाकारलं आहे. ज्यांच्या नेतृत्वाला कोणीही साथ द्यायला तयार नाही. त्यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करुन आम्हाला कोणता फायदा मिळणार आहे. मी प्रॅक्टिकल विषय सांगतो. म्हणजे आम्ही लाभ असला, तरी करणार नाही. पण सांगा आम्हाला काय लाभ आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘राज ठाकरेंजवळ योग्य कागदपत्रं असतील, तर ते देतील. आणि त्यांचं म्हणणं ईडी सुद्धा ऐकतील. नसतील तर ईडी कारवाई करेल. त्याच्यात भाजपला, आम्हाला गोवण्याचं काही कारण नाही’ असंही विधान मुख्यमंत्र्यांनी केले.