देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर शरद पवार झाले अलर्ट ; राजकीय हालचालींना सुरुवात

Devendra Fadnavis-Sharad Pawar-Uddhav Thackeray

मुंबई :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरणात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहे . दरम्यान या भेटीवर दोन्ही नेत्यांनी सूचक प्रतिक्रिया दिल्याचे चित्र आहे . आम्हाला सरकार स्थापनेची कोणतीही घाई नाही. हे सरकार त्यांच्या कृतीने खाली कोसळेल. ते कोसळेल तेव्हा आम्ही बघू,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर दिली.फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे अलर्ट झाले असून त्यांनी राजकीय घडामोडींना सुरुवात केली आहे .

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत तातडीने बैठक बोलावली आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज बैठक होणार आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली होती. त्यानतंर फडणवीसांनीही या भेटीबाबत खुलासा केला . शरद पवारांनी राऊत आणि फडणवीसांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपल्या राजकीय हालचालींना सुरुवात केली आहे .

ही बातमी पण वाचा : राऊत – फडणवीस भेटीनंतर शरद पवारांचे सावध पाऊल ; ‘वर्षा’वर बोलावली तातडीची बैठक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER