नारायण राणे महाराष्ट्राचे दबंग नेते, झोप विसरून मेहनत करतात- देवेंद्र फडणवीस

सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. झोप विसरून ते मेहनत करतात. आज मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग येथे नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. मी स्वत: अतिशय जवळून राणेंचा संघर्ष बघितलाय. मेडिकल कॉलेज उभारताना अनेक अडचणी आल्या. इतके इन्स्पेक्शन होतात.या सगळ्या गोष्टींना सामोरे जात त्यांनी सगळा पाठपुरावा केला. अखेर या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं, असंही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राचे दबंग नेता म्हणून नारायण राणे यांची ख्याती आहे. अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात. त्यामधील नारायण राणे हे एक आहेत, असे म्हणत फडणवीसांनी राणेंचे कौतुक केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER