देवेन भारती राज्याच्या एटीएस प्रमुखपदी, अन्य 14 अधिका-यांच्या बदल्या

Deven Bharti

मुंबई: महाराष्ट्रात आयपीएस अधिकारी देवेने भारती यांना पदोन्नती देण्यात येऊन त्यांच्याकडे राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. राज्य सरकारने अपर पोलिस महासंचालक आणि विशेष महानिरीक्षक पदाच्या 14 अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे.

देवेन भारती हे मागील महिन्याभर आर्थिक गुन्हे शाखेचे सह-पोलिस आयुक्त म्हणून कारभार पाहात होते. तर सर्वाधिक चार वर्षे कायदा व सुव्यवस्था सहपोलिस आयुक्तपदावर काम करण्याचा विक्रमही त्यांच्यानावावर आहे. त्याचप्रमाणे गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदाची जबाबदारीदेखील त्यांनी जवळपास 5 वर्षे सांभाळली. पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी असलेले देवेन भारती अतिरिक्त पोलिस महासंचालक या पदावर बढतीसाठी जानेवारी २०१९ पासूनच पात्र होते.

ही बातमी पण वाचा : दहशतवाद्याला कोणताही धर्म नसतो, त्याला तिथल्या-तिथे ठेचलंच पाहिजे : राज ठाकरे

मुंबईत अपर पोलीस महासंचालकपदी असलेल्या डॉ. प्रज्ञा सरवदे यांची पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित विभागाच्या प्रमुख पदी बदली करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाचे विद्यमान अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे. पुण्याचे अपर पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांची मुंबईत बदली झाली आहे.

गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनाही बढती देण्यात आली असून ते आता मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्हणून काम पाहतील. फोर्स वनचे विशेष पोलीस महासंचालक हे पद उन्नत करून अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन असे करण्यात आले आहे, सध्याचे फोर्स वनचे प्रमुख डॉ. सुखविंदर सिंह यांना या नव्या अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन पदावर बढती मिळाली आहे.

ही बातमी पण वाचा : दिलीप माजगावकर यांना ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर