रायगडावर विकास कामांना सुरुवात : खा. संभाजीराजे यांची माहिती

Sambhaji Raje

रायगड : पावसाळा व लॉकडाउननंतर रायगड विकास प्राधिकरणाची सर्व कामे सूरू करण्यात आली आहेत. त्यात पायरी मार्गाची कामे म्हणजे चित्त दरवाजा ते महा दरवाजा मार्गाचे उर्वरीत पायऱ्यांचे बांधकाम, तसेच संरक्षक भिंतीचे काम सुरु करण्यात आले आहे. चित्त दरवाजाच्या प्रदर्शनीय भागाचे काम प्राधिकरणामार्फत चुना, दगड, सुर्खी व बेलफळ या पारंपारीक बांधकाम साहित्याने पुर्ण केले आहे, अशी माहिती खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

खा. संभाजीराजे म्हणाले, मागील काही दिवसा पूर्वी पुरातत्व विभागाने चित्त दरवाजा येथे तात्पुरत्या स्वरुपात तिकीट खिडकी सूरू केली आली आहे. तिकीट खिडकीच्या दृश्य स्वरुपाबद्दल माझ्याकडे अनेक शिवभक्त व पर्यटकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातील काही प्रतिक्रिया तत्काळ पुरातत्व विभागाचे अधिक्षक यांच्याकडे पाठवून दिल्या व शिवभक्तांच्या भावना लक्षात आणून दिल्या आहेत. तसेच त्याचे दृश्य स्वरुप हे ऐतिहासिक पध्दतीचेच असले पाहिजे ही बाब लक्षात आणुन दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी फार लांबून शिवभक्त गडावर येत असतात. त्यांना काही नियम लावून राजसदरेवर जाण्यास परवानगी दिली पाहीजे, यासाठी दोन महिन्यापूर्वीच संबधित अधिकाऱ्यांशी बोललो आहे.

तसेच सध्या जे राजसदरेला शोभत नाही, अश्या पध्दतीचे बरँकेटस लावले आहेत ते तत्काळ काढावेत यासाठी पत्रव्यव्हार चालू आहे. राजसदरेला शोभेल असे ऐतिहासिक दिसतील व त्या पवित्र वास्तूशी एकरुप होतील असा आराखडा तयार करुन रायगड विकास प्राधिककरणाच्या वतीने केंद्रीय पुरातत्व खात्याला सादर केला आहे. पण त्याला परवानगी मिळालेली नाही. याची परवानगी मिळताच प्राधिकरणाच्या वतीने हे काम पुर्ण केले जाईल, असे खा. संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER