घोडबंदर किल्ल्याचा तसेच उपवन परिसराचा विकासाबाबत सकारात्मकता – आदित्य ठाकरे

आज ठाण्याच्या संस्कृती आर्ट फेस्टिवलला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती

Ghodbandar fort-Aditya Thackeray

ठाणे :- ठाण्यातील घोडबंदर किल्ल्याचा विकास करून शिवसृष्टीच्या धर्तीवर प्रकल्प उभारण्यात येणार असून उपवन तलाव आणि उपवन घाट याचा विकास करण्याची सकारात्मकता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दर्शवली आहे. संस्कृती आर्ट फेस्टिव्हल सोहळ्याचा सांगता सोहळा संपन्न झाला यावेळी शेवटच्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली शिवाय नाइट लाइफ ज्याप्रकरे मुंबईत सुरू केली तशी टप्याटप्याने ठाणे व इतर शहरात त्यांच्या मागणी नुसार विचार करू असे ही मत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

ही बातमी पण वाचा : आदित्य ठाकरे यांच्याकडून कोल्हापूरच्या प्लास्टिक मुक्तीचे कौतुक

ठाण्यातील उपवन तलाव परिसरात संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. गेली चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हल मध्ये अनेक मान्यवरांनी तसेच दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यंदाच्या सहाव्या वर्षी संस्कृती आर्ट्स फेस्टिवलने सध्याच्या जगण्याच्या दृष्टीने महत्वाचा असा ‘कलेचे हृदय’ हा विषय घेण्यात आला होता. या महोत्सवाने मनाच्या कलासक्तीमधून आपल्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याचा आणि शाश्वत भविष्याकडे निघण्याचा विचार जनतेला देण्याचे आयोजकांनी ठरवेल होते. ठरविले आहे. मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला.


Web Title : Positiveness about the development of the Ghorbandar fort and the suburbs – Aditya Thackeray

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Thane City, Nagpur City, Mumbai City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)