विकास फक्त बारामतीचाच, राष्ट्रवादीच्या आमदाराकडून पक्षाला घरचा आहेर

sharad pawar .jpg

पुणे : ‘पुणे जिल्ह्यात केवळ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) बारामती आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या आंबेगावात विकास होत आहे’, असं म्हणत राष्ट्रवादीच्या आमदारांने आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. यावेळी त्यांनी वेगळा विचार करण्याच्या सूचना व सूचक इशाराही त्यांनी दिला.

दिलीप मोहिते सध्या आपल्याच नेत्यांच्या आणि सरकारच्या विरोधात विधाने करताना दिसून येत आहेत. भामा आसखेड धरणाच्या पाण्याबाबत त्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. भीमाशंकर परिसर देवस्थान विकास यावरून ते दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका करत आहे. जिल्ह्यातील फक्त दोन तालुक्याचा विकास होताना दिसून आहे. असे त्यांनी म्हटले. खेड तालुक्याला आतापर्यंत मंत्रिपद मिळाले नसल्याने सध्या मोहिते नाराज आहेत. आता थेट आरोप केल्याने दिलीप मोहिते यांच्यावर राष्ट्रवादी काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER