कोकणचा ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकास करा : शरद पवार

Sharad Pawar

मुंबई : कोकण हे नैसर्गिक साधनसंपत्तीने भरलेले आहे. कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलतेची विपूलता असून जगाच्या पाठीवर संशोधन करणाऱ्या भारतीयांपैकी अनेक जण कोकणातील आहेत. तसेच कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर इनोव्हेटीव्ह’ (International Greenfield Innovative Region)संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता असल्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल् इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्या. आज कोकण विभागास आंतरराष्ट्रीय नवोन्मेश विभाग म्हणून विकसित करण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन कोकणच्या शाश्वत विकासासाठी बांधिल आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीत उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई, कौशल्य विकास मंत्री ना. नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे, परिवहनमंत्री ना. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत, पर्यावरण मंत्री ना. अदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री अदिती तटकरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिक काकोडकर, पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER