पड्डीकलला पदार्पणात अर्धशतकाची सवयच !

Devdutta Paddikal.jpg

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या (RCB) सोमवारच्या विजयात हैदराबादच्या (SRH) घसरगुंडीचीच चर्चा असली तरी त्यांच्या एका खेळाडूचीही चर्चा आहे. तो म्हणजे सलामी फलंदाज देवदत्त पड्डीकल (Devdutta Paddikal)

या गड्याने आरोन फिंचसोबत (Aaron Finch) डावाची सुरुवात करताना आपल्या आयपीएल पदार्पणातच 42 चेंडूत 56 धावांची खेळी केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसे पदार्पणात अर्धशतक ही त्याच्यासाठी काही नवी गोष्ट नव्हती, कारण त्याने प्रथम श्रेणी (रणजी ट्रॉफी), मर्यादीत षटकांचे सामने (लिस्ट ए) आणि टी-20 सामन्यांमध्ये पदार्पणातच अर्धशतक केलेले आहे आणि तीच मालिका पुढे वाढवताना त्याने आयपीएलच्याही पदार्पणात अर्धशतक झळकावले.

कर्नाटकच्या या फलंदाजाची टी-20 मध्ये सरासरी 64 आणि स्ट्राईक रेट 176 आहे. 12 सामन्यातील त्याची ही कामगिरी कोणत्याही निकषावर टी-20 साठी केवळ चांगली नाही तर उत्कृष्ट आहे. ज्या पध्दतीने त्याने सूरुवात केली, पहिले चार चेंडू संयमाने खेळून काढले आणि संधी मिळताच पाचवा चेंडू फटकावला. ते पाहता खराब चेंडूची वाट पाहता संयमाने खेळायची त्याची शैली दिसुन आली. तरीही 2018 पासून विचार केला तर टी-20 मध्ये त्याचा स्ट्राईक रेट 240 असा भन्नाट आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूमागे त्याने दोन धावा काढल्या आहेत. हा त्याचा स्ट्राईक रेट हा टी-20 सामन्यांमध्ये किमान 500 धावा करणाऱ्या 349 फलंदाजांमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे त्याला आरसीबीच्या संघात स्थान मिळाले तेंव्हा त्याच्या कुटुंबियांपैकी कुणालाच आश्चर्य वाटले नाही.

देवदत्त हा क्रिकेटपटूच बनणार होता कारण त्याच्या आई अंबिली पड्डिकल सांगतात, ‘जेंव्हा आम्ही दुसरे बाळ आणण्याचा विचार केला तेंव्हाच आम्ही ठरवले होते की मुलगा झाला तर त्याला आम्ही क्रिकेटर बनवणार. त्याचे वडील बाबुनू म्हणतात की सामना बंगळुरुमध्ये आसता तर मी नक्की बघायला गेलो असतो. पण तो योग येण्यासाठी त्यांना आता पुढच्या आयपीएलची वाट बघावी लागणार आहे. मात्र तो काही त्याचा पहिला आयपीएल सामना नसेल म्हणून पहिल्या सामन्याच्या आनंदाला आम्ही मुकलो हे खरेच असे ते म्हणतात. त्याचे प्रशिक्षक मोहम्मद नसीरुद्दीन म्हणतात की, त्याला फलंदाजी करताना जो कुणी बघेल तो नक्कीच खूश होईल. त्याची सव्वासहा फूट उंची ही त्याची जमेची बाजू आहे कारण त्याला उसळता चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजांना पूर्ण जोर लावावा लागतो. तरीही चेंडू त्याला त्रासदायक ठरेल एवढा उसळत नाही.

केपीएल 2017 मध्ये त्याने बंगळुरु ब्लास्टर्सविरुध्द 53 चेंडूत 72 धावा केल्या. कूचबिहार ट्राॕफीत त्याने 829 धावा केल्या. त्याच्या जोरावर रणजी संघात स्थान मिळाल्यावर त्याने महाराष्ट्राविरुध्द पदार्पणातच 77 धावा केल्या. 2019 च्या केपीएलचा तो सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू ठरला.विजय हजारे ट्रॉफीत त्याने 67 च्या सरासरीने 609 आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत 175 च्या स्ट्राईकरेटने 580 धावा केल्या. आणि आता आयपीएलमध्येही त्याने दमदार सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER