सूतगिरण्या पुनर्जीवित करण्यासाठी कटिबद्ध ; वस्त्रोद्योग मंत्री शेख

सांगली :- देशाच्या दृष्टीने वस्त्रोद्योग सक्षम करणे अत्यंत महत्वाचे आहे. सुतगिरण्यांना स्वत:च्या पायावर उभा करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू. सर्व संबंधितांशी चर्चा करून ठोस निर्णय घेऊन सुतगिरण्यांना पुनर्जीवित करण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी मंगळवारी पलूस येथे दिली. कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी पलूस येथे पश्चिम महाराष्ट्रातील सुतगिरण्यांचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक यांच्या सोबत मंत्री शेख यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री विश्र्वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, महेंद्र लाड, शांताराम कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी, वस्त्रोद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पोलिसांविरोधात उपोषण न करण्यासाठी फिल्टरची मागणी करणाऱ्या ओबीसी महासंघाच्या नेत्याला अटक

मंत्री शेख म्हणाले, सुतगिरण्यांना उर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी वस्त्रोद्योग धोरणाचा बारकाईने अभ्यास करून त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने येत्या आठ ते दहा दिसात सर्व संबंधितांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू. सुतगिरण्यांच्या पदाधिकार्‍यांनी मांडलेल्या सूचना लक्षात घेऊन त्यावर ठोस कार्यवाही करण्याबरोबरच मत्स्यव्यवसायालाही चालना देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार राज्यमंत्री कदम म्हणाले, सांगली सहकाराची पंढरी आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत सहकाराचे फार मोठे महत्व आहे. यामध्ये सुतगिरण्यांचा महत्वाचा वाटा आहे. रोजगार निर्मितीत सुतगिरण्यांचे योगदान मोठे असून ग‘ामीण भागातील लोकांना, अशिक्षीत तरूणांना रोजगार देण्याचे काम सुतगिरण्यांमुळे होत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे सुतगिरण्या आजारी अवस्थेत असून त्यांना यामधून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजनांची व मदतीची आवश्यकता आहे.

बैठकीस उपस्थित असलेल्या सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर सुतगिरण्यांच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना असलेल्या अडीअडचणी सांगितल्या व सुतगिरण्यांना आजारी अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी वीज बिल अनुदान, सबसीडी, सौर उर्जा, बँकामार्फत वसुली या विषयांवर सविस्तर मते मांडली व याबाबत ठोस उपाय योजना व मदत करण्याची मागणी केली. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सहायक आयुक्त योगेश भाकरे यांनी वस्त्रोद्योग धोरणाचे सादरीकरण केले