HRCT प्रमाणेच रेमडेसिवर व औषधांचे दर निश्चित करा : राजू शेट्टी

कोल्हापूर :  HRCT दर निश्चित करून राज्य शासनाने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. HRCT प्रमाणेच रेमडेसिवर आणि इतर औषधांचे दर निश्चित करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवंसेदिवस वाढत आहेत. दोन्ही जिल्हयातील खासगी व सरकारी हॉस्पीटलमध्ये उपचार घेण्यासाठी लोकांची तारांबळ उड़त आहे. खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असताना आर्थिकृष्ट्या सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी HRCT चाचणी प्रमाणे रेमडेसिवर आदी औषधांचे दरनिश्चिती केल्यास त्याचा थेट फायदा सर्वसामान्य लोकांना होणार आहे .

सध्या सांगली व कोल्हापूर जिल्हयात खासगी दवाखान्यामध्ये रेमडेसिवरचा तुटवडा आहे. ५ हजारापासून ते १० हजारपर्यंत एका इंजेन्क्शन साठी पैसे दयावे लागत आहेत. यामध्येही तीन कंपन्या असून तीनही कंपन्याचे दर वेगवेगळे आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होत आहे. तशीच परिस्थिती औषधांच्या बाबतीत झाली आहे. या कंपन्याकडून जादा औषधांच्या उत्पादन खर्चाची माहिती घेऊन दरामध्ये सवलत द्यावी. तसेच ही औषधे ड्रग्स प्राईज कंट्रोलमध्ये समाविष्ट केल्यास याचा सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल. त्यामुळे हा निर्णय घ्यावा असे, असे शेट्टी यांनी निवेदनात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER