
अमरावती : कुणाच्या बायका – मुलांना ईडीची (ED)नोटीस आली तर संजय राऊत यांना त्यात नामर्दपणा दिसतो. मग, कंगनाविरोधात जी कारवाई केली, जे आकांडतांडव केले तो मर्दपणा होता का? असे प्रश्न विचारत आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या आज झालेल्या पत्रकार परिषदेवर सडकून टीका केली. ईडीच्या एका नोटीसमुळे संजय राऊत चांगलेच हादरले आहेत.
त्यांनी दमबाजी करू नये. भाजपा दमबाजीला भीत नाही, असे शेलार यांनी राऊतांना बजावले. पत्रपरिषदेत शेलार म्हणालेत, संजय राऊत यांनी उगाच “डराव डराव” करू नये. दमबाजी तर मुळीच करू नये. ईडीच्या एका नोटीसमुळेच ते हादरले आहेत. मुकाट्याने दाम – दमडीचा हिशेब ईडी कार्यालयात जाऊन द्या. भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, माजी मंत्री प्राचार्य अशोक उईके, आ. आकाश फुंडकर, आ. प्रताप अडसड प्रामुख्याने उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला