एमआयएमला पाठिंबा देऊनही शिवसेनेचे स्वप्न भंगले, अमरावती महापालिकेत भाजपचाच सभापती

Amravati Municipal Corporation - Asaduddin Owaisi - CM Uddhav Thackeray - Maharashtra Today

अमरावती : असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या एमआयएमला (MIM) संकट म्हणून संबोधणाऱ्या शिवसेनेने चक्क अमरावती महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आश्चर्य व्यक्त केलं जातहोत. या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसने (Congress) एमआयएमला थेट तर मायावतींच्या बीएसपीने अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याने खळबळ उडाली होती.

अमरावती महानगरपालिका (Amravati Municipal Corporation) स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपाचे शिरीष रासने यांनी बाजी मारली. या निवडणुकीत रासने यांना ९ मते मिळाली तर एमआयएमचे अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना ६ मते मिळाली. त्यामुळे महापालिकेच्या चाव्या भाजपच्या हाती आल्या आहेत. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने एमआयएमला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्या चाव्या भाजपच्या हातात पडू न देण्याचे स्वप्नही भंगले आहे. तसेच शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याची टीकाही होत आहे.

भाजपने स्थायी समिती सभापतीसाठी शिरीष रासने यांचे नाव जाहीर केल्यानंतर भाजपचे दोन सदस्य नाराज झाले होते. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवावं यासाठी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम व बीएसपी यांनी एकत्र येण्याचं ठरवलं. मात्र ऐनवेळी बसपाचे गटनेते चेतन पवार हे निवडणुकीत गैरहजर राहिले. यामुळे विरोधकांचे संख्याबळ कमी झालं. बीएसपीचे गटनेते चेतन पवार जर काँग्रेस शिवसेना एमआयएमच्या बाजूने उभे राहिले असते तर भाजपाचे २ नाराज सदस्य गैरहजर राहणार होते. अशा परिस्थितीत ईश्वर चिठ्ठीने ही निवडणूक पार पडली असती. मात्र ऐन वेळी बीएसपीचे चेतन पवार गैरहजर राहिल्याने एमआयएमच्या वतीने अफजल हुसेन मुबारक हुसेन यांना स्थायी समिती सभापती पदासाठी उभे करण्यात आले.

भाजपला रोखण्यासाठी एमआयएमच्या सदस्याला हिंदुत्ववादी समजल्या जाणाऱ्या शिवसेनेने पाठिंबा दिला तर धर्मनिरपेक्ष समजल्या जाणाऱ्या बहुजन समाज पक्षाने निवडणुकीत गैरहजर राहून अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली. आमदार रवी रणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या एका सदस्याने भाजपच्या रासने यांना पाठिंबा दिला. त्यामुळे रासने यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER