चांगली गीते गाऊनही या गायकाला काम मिळाले नाही

Udit Narayan

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (SSR) मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये (Bollywood)नेपोटिझम असल्याची चर्चा जोरात सुरु झाली. नेपोटिझमसोबतच गटबाजीचीही चर्चा सुरु झाली. अनेकांनी याबाबतची आपले मते आणि आपले अनुभव व्यक्त केले. केवळ नेपोटिझमच नव्हे तर गटबाजीमुळेही अनेकांना त्यांचा पिता यशस्वी असूनही काम मिळाले नसल्याचेही समोर आले. असाच एक तरुण गायक. त्याचा पिता बॉलिवुडमधील प्रख्यात आणि यशस्वी गायक, शाहरुख खानचा आवाज म्हणूनही तो ओळखला जातो. पित्याच्या पावलावर पाऊल टाकून मुलानेही गायनाच्या क्षेत्रात प्रवेश केला.

मात्र त्याला सहजासहजी संधी मिळाली नाही. दिग्दर्शक, निर्माते आणि संगीतकारांच्या घरी जाऊन हा मुलगा काम मागत असे. सुरुवातीला त्याला काम मिळालेही आणि आपल्या आवाजाने त्याने हिट गाणीही दिली. परंतु तो कोणत्याही गटबाजीत सामिल झालेला नसल्याने लवकरच त्याला दूर सारण्यात आले. 2013 मध्ये त्याने संजय लीला भंसाळीच्या गोलियों की रासलीला रामलीला चित्रपटात दोन हिट गाणी देऊनही त्याचा संघर्ष अजूनही सुरु आहे. हा तरुण गायक आहे आदित्य नारायण आणि त्याचे वडिल उदित नारायण (Udit Narayan) जे बॉलिवूडमधील यशस्वी गायक आहेत. स्वतः आदित्यनेच ही गोष्ट सांगितली. गेल्या अनेक वर्षांपासून मी बॉलिवूडमध्ये असूनही आणि चांगली गाणी गाऊनही मला बाहेरची व्यक्ती असल्याप्रमाणे वागणूक दिली जाते. संजय भंसाळींच्या ‘रामलीला’मध्ये दोन सुपरहिट गाणी दिल्यानतंरही सहा वर्ष मला कोणी काम दिले नव्हते. मी विशाल शेखर, प्रीतम, शंकर एहसान लॉय सगळ्यांना भेटलो आणि काम मागितले पण कोणीही काम दिले नाही असेही आदित्यने सांगितले. यावरूनच बॉलिवू़डमध्ये गटबाजी किती मोठ्या प्रमाणात आहे ते दिसून येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER