आजीच्या निधनानंतर शेन वॉटसन दुसऱ्याच दिवशी संघासाठी उतरला मैदानात

तीन वेळा आयपीएलचा (IPL) विजेता चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सलामीवीर शेन वॉटसनने (Shane Watson) आपल्या आजीच्या निधनानंतरही शुक्रवारी दिल्ली कैपिटल्सविरुद्ध खेळल्याचे उघड झाले आहे. आयपीएलच्या या मोसमात वॉटसनची कामगिरी काही खास राहिली नव्हती आणि त्याने चेन्नईकडून तीन सामन्यांत एकूण ५१ धावा केल्या आहेत. आजीच्या मृत्यूनंतरही शेन वॉटसन संघासाठी आपली जबाबदारी विसरला नाही आणि दुसर्‍याच दिवशी तो दिल्लीच्या कैपिटल्सच्या विरोधात मैदानात उतरला, त्यानंतर सोशल मीडियावरील लोक त्याला योद्धा म्हणून संबोधत आहेत.

वॉटसन म्हणाला की, दिल्ली कैपिटल्स विरूद्धच्या सामन्याच्या दोन दिवस आधी त्याची आजी रिची यांचे निधन झाले. त्यानंतर त्याने आपल्या कुटुंबीयांना घरी परत पाठवले आणि या कठीण काळात तेथे हजर न राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. शेन वॉटसन म्हणाला की मी माझ्या कुटुंबाला घरी पाठवत आहे. मला माहित आहे की त्यांच्या आईने माझ्या आईला काय म्हणायचे होते. मला माफ करा मी आत्ता त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. शेन वॉटसनच्या या खुलाश्यानंतर सोशल मीडियावरील लोक त्याला खरा खेळाडू आणि योद्धा म्हणून संबोधत आहेत. त्याचे चाहते त्याच्या सन्मानार्थ पोस्ट करत आहेत.

या आयपीएल हंगामात शेन वॉटसनची कामगिरी आतापर्यंत काही खास नाही राहिली. तो मुंबई इंडियन्स विरूद्ध चार धावांवर बाद झाला आणि त्याच्या पहिल्या दोन सामन्यात १४ आणि ३३ धावा केल्या. पहिला सामना जिंकल्यानंतर पुढील दोन सामनेही संघाने गमावले आहेत, यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चिंता वाढली आहे. यापूर्वी प्रसिद्ध भाष्यकार डीन जोन्स यांच्या निधनानंतरही वॉटसन खूपच भावनिक झाला होता आणि त्यावेळी शेन वॉटसन म्हणाला होता की असा हुशार व्यक्ती आपल्याबरोबर नाही यावर माझा विश्वास नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER