मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला एकही जागा नाही, त्यांनीही आत्मचिंतन करावं – फडणवीस

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई :- विधान परिषदेच्या सहा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसला (Congress) प्रत्येकी दोन, भाजपा (BJP) १ आणि अपक्ष १ असे चित्र आहे. मात्र शिवसेनेला (Shiv Sena) मिळालेल्या जागेवर अपक्ष उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहे.त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला टोला लगावला

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली. या निकालाचं विश्लेषण करायचं झालं तर भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. परंतु आमच्या स्ट्रॅटेजीत चूक झाली असेल. तसेच तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याबाबतचं आमचं आकलन चुकलं. आता आम्हाला त्यांची ताकद समजली आहे. त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरु.

फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक अचानक लागली, त्यामुळे अनेक ठिकाणी नोंदणी राहिली. सरकारी पातळीवर झालेल्या नोंदणीमुळे फटका बसला. आम्ही मतदारांची नोंदणी करण्यात कमी पडलो. माझ्या घरची, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या घरची चार नावं नाहीत. तरीदेखील जे निवडणूक जिंकले आहेत त्यांना शुभेच्छा. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटतेय, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा निवडून आली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना फायदा झाला आहे. या निकालांनंतर जसं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, तसंच ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा येत नाही, त्यामुळे त्यांनीही आत्मचिंतन करावं, असा टोला फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडीमुळे राजकीय समीकरणं बदललं, भाजप ऑपरेशन लोटस बारगळणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER